अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या कार्याला समाजातून मोठा प्रतिसाद – श्री महेशजी ढवळे यांचे नेतृत्व प्रभावी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या कार्याला समाजातून मोठा प्रतिसाद – श्री महेशजी ढवळे यांचे नेतृत्व प्रभावी…

अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या कार्याला समाजातून मोठा प्रतिसाद – श्री महेशजी ढवळे यांचे नेतृत्व प्रभावी

नंदकुमार बागडेपाटील प्रतिनिधि….

सांगली : गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर समाजाच्या विकासासाठी विविध संघटनांच्या बैठकांचे वृत्त पाहायला मिळत आहे. मात्र, समाजाच्या खऱ्या प्रगतीसाठी केवळ चर्चा नाही, तर ठोस कृती गरजेची आहे. याच दृष्टीकोनातून कार्यरत असलेल्या अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघ या संघटनेच्या प्रयत्नांना समाजाचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री दर्जाचे माननीय श्री महेशजी ढवळे यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे संत नामदेव आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले असून, हे महामंडळ समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू होते, मात्र त्याला यश मिळवून देण्यात महेशजी ढवळे यांचा सिंहाचा वाटा आहे.

संत नामदेव महाराज स्मारक – ऐतिहासिक पुढाकार

संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचे जागतिक दर्जाचे स्मारक पंढरपूर येथे उभारण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मात्र, महेशजी ढवळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे लवकरच या स्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. ही बाब संपूर्ण नामदेव समाजासाठी गौरवाची आहे.

रोजगार आणि विकास योजनांना चालना

समाजाच्या आर्थिक व व्यावसायिक प्रगतीसाठी रोजगार निर्मिती हा मुख्य मुद्दा असून, महेशजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली एकसंघाने अनेक योजना तयार केल्या आहेत. यामुळे समाजातील तरुणांना नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील.

संघटनेच्या वाढत्या प्रभावाने इतर संघटनांना अस्वस्थता?

अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे काही संघटनांना हे पचनी पडत नसल्याचे चित्र दिसत आहे. सोशल मीडियावर संघटनेच्या कार्याविषयी दिशाभूल करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. मात्र, प्रत्यक्ष कृती करणाऱ्या संघटनेला समाज बांधवांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट आहे.

समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकसंघ हाच पर्याय

महेशजी ढवळे यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघ समाजाच्या हितासाठी सातत्याने कार्यरत आहे. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकसंघाचे योगदान मोठे असून, भविष्यात संघटित होऊनच अधिक सक्षम होता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

– श्री. धनंजय शकुंतला बाळकृष्ण गोंदकर, सांगली
– श्री प्रभु पुनम राजेंद्र सोनवणे
– श्री मनोज रमेश भांडारकर

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...


What do you like about this page?

0 / 400

12:53