गुहागर तालुका शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप
गुहागर – तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालय अबलोली येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमाचा नुकताच यशस्वी समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्र संचालक व शिक्षण विस्तार अधिकारी प्रभाग अबलोलीचे श्री. विश्वास खर्डे साहेब प्रमुख उपस्थित होते. तसेच, विषय शिक्षक परमेश्वर लांडे, साखरे सर, मोहिते मॅडम, तज्ञ मार्गदर्शक श्री. पिसाळ सर, रणे सर, माणगावकर सर, जाधव सर, पाटील सर, प्रदीप जाधव सर, प्रताप दिसले सर, दीपक रामाने सर, आखाडे सर, किनोळकर सर, वाकडे सर, प्रभू हंबर्डे सर, मनोज पाटील सर यांसह तालुक्यातील अनेक शिक्षक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रभू हंबर्डे सर यांच्या मार्गदर्शनाखाली काहूत ऍक्टिव्हिटी रिझल्ट जाहीर करण्यात आला. विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे:
- अ वर्ग
- प्रथम : विकास बलशेठवार
- द्वितीय : सविता देशमुख
- तृतीय : प्रियंका कोष्टी
- ब वर्ग
- प्रथम : सचिन लबडे
- द्वितीय : कल्पेश धावडे
- तृतीय : प्रमोद साळवी
- क वर्ग
- प्रथम : दत्ताराम धनवडे
- द्वितीय : आशुतोष चितळे
- तृतीय : विशाल जोशी
- ड वर्ग
- प्रथम : कुरेशी मूत्साह
- द्वितीय : मनोज शिंदे
- तृतीय : मंगेश दवंडे
प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने तज्ञ मार्गदर्शकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक नेते कैलास सर, शिक्षक नेते चंद्रकांत पागडे सर आणि उपस्थित शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान आणि अध्यापन कौशल्ये आत्मसात करण्याच्या संकल्पाने प्रेरित होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.















