🔴 वाल्मिक कराडच्या अडचणीत मोठी वाढ; संपत्तीवर येणार टाच!
▶️ डिलिट केलेला मोबाईल डेटाही रिकव्हर; एसआयटीकडून कारवाईला वेग
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड याचे नाव पुढे आले असून, सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात त्याच्या संपत्तीचा थक्क करणारा तपशील समोर आला आहे.
💠 डिलिट केलेला मोबाईल डेटा उघड; एसआयटीकडून कसून चौकशी
वाल्मिक कराडकडे असलेल्या तीन आयफोनमधील (iPhone 16 Pro, iPhone 13 Pro गोल्डन आणि iPhone 13 Pro निळ्या रंगाचा) डेटा त्याने डिलिट केला होता. मात्र, एसआयटी पथकाने तंत्रज्ञांच्या मदतीने हा डेटा पुन्हा मिळवला आहे. यातून अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कराडच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
💰 श्रीमंतीचा थक्क करणारा आलेख; एसआयटी मालमत्ता जप्तीच्या तयारीत
सीआयडीच्या तपासात कराडच्या ऐषारामी जीवनशैलीचे धक्कादायक तपशील उघड झाले आहेत. त्याच्याकडे कोट्यवधींच्या महागड्या गाड्यांचा ताफा आहे.
🚘 महागड्या गाड्यांची यादी:
- फोर्ड इंडेव्हर – MH-44/T-0700
- अशोक लेलँड (हायवा) – MH-44/U-0700
- जॅग्वार लँड रोव्हर – MH-44/AC-0700
- जेसीबी इंडिया लिमिटेड – MH-44/S-7450
- मर्सिडीज बेंझ – MH-44/Z-0007
- बीएमडब्ल्यू इंडिया – MH-44/AC-1717
- अशोक लेलँड (हायवा) – MH-44/U-1600
🔎 पुढील तपास वेगात; संपत्तीवर टाच येण्याची शक्यता
एसआयटीकडून या सर्व मालमत्तेचा तपशील गोळा करून पुढील कारवाईची तयारी सुरू आहे. कराडच्या बँक खात्यांचीही सखोल चौकशी केली जात असून, काळ्या पैशांचा शोध घेतला जात आहे. यामुळे लवकरच त्याच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता आहे.
➡️ वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार का? त्याच्या मालमत्तेवर कारवाई कधी होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे!

Author: Ratnagiri Vartahar
⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️