राजापूर तालुक्याच्या ग्रामिण भागात लोकवस्तीत बिबट्याचा वावर वाढला,

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजापूर तालुक्याच्या ग्रामिण भागात लोकवस्तीत बिबट्याचा वावर वाढला,

सर्वसामान्या मध्ये घबराट…..

वडदहसोळ येथील ग्रामस्थ गिरीष म्हादये यांच्या घराच्या अंगणामध्ये गेले दोन दिवस बिबट्या

राजापूर – संदीप शेमणकर ????️

राजापूर गेल्या काही महिन्यांपासून तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरामध्ये बिबट्याच्या लोकवस्तीतील बिनधास्त वावराने लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. अशातच आता वडदहसोळ भागामध्ये बिबट्याचा लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. वडदहसोळ येथील ग्रामस्थ गिरीष म्हादये यांच्या घराच्या अंगणामध्ये गेले दोन दिवस बिबट्या रात्रीच्यावेळी आल्याचे त्यांच्या घर परिसरामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये दिसून आले आहे.

गेल्या काही वर्षापासून तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरामध्ये बिबट्याचा राजरोस वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन वर्षापूर्वी तर, शहरासह ग्रामीण भागामध्ये पाळीव जनावरांची शिकार करणार्‍या बिबट्याने वाहन चालकांवर रात्रीच्योवळी हल्ला करून जखमी केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गोवळ परिसरामध्ये सातत्याने गोठ्यामध्ये घुसून शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरांना हल्ला करून बिबट्याने नुकसान केल्याच्या  घटना घडल्या आहेत. लोकवस्तीतील बिबट्याच्या या बिनधास्त वावराने सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण केली आहे.तर, दिवसाढवळ्या शेतशिवारामध्ये तर, रात्रीच्यावेळी लोकवस्तीमध्ये बिनधास्त येवून पाळीव जनावरांना बिबट्याकडून हल्ला होवून नुकसान केले जात असल्याने शेतकरीही भयभीत झाला आहे. मात्र, बिबट्याचा अद्यापही बंदोबस्त करण्यात वनविभागाला यश आलेले नाही.

अशातच, तालुक्यातील वडदहसोळ भागामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. सातत्याने रात्रीच्यावेळी लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात असताना वडदहसोळ येथील ग्रामस्थ श्री.म्हादये यांनी आपल्या घराच्या आवारामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये बिबट्या आल्याचे कैद झाले आहे. त्यामुळे या भागामध्ये बिबट्याचा वावर असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गिरीष म्हादये यांच्यासह ग्रामस्थांकडून वनविभागाकडे करण्यात आली आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के