दि.२५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्य व्यापी सामुहिक रजा आंदोलनात  सर्व शिक्षक संघटना सहभागी होणार..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दि.२५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्य व्यापी सामुहिक रजा आंदोलनात  सर्व शिक्षक संघटना सहभागी होणार.

रत्नागिरी (वार्ताहर)- शासनाच्या काही निर्णय या विरोधात राज्य भरातील  सर्वच शिक्षक  संघटनांनी एकत्रित येऊन आवाज उठवण्याचा ठरवल आहे, त्या विषयी अखिलमहाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाची सभा मंगळवार दि.१७/०९/२०२४ रोजी स.ठीक १०:००वा.राज्य संघाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.देविदास बस्वदे यांच्या अध्यक्षतेखाली गुगलमीट द्वारे संपन्न झाली.सदर सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.या सभेत झालेल्या चर्चेनुसार दि.२५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्य व्यापी सामुहिक रजा आंदोलनात आपली संघटना सक्रीय सहभाग घेत आहे.
===================
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संचमान्यतेत बाबत दि.१५/०३/२०२४ चा व कंत्राटी शिक्षक भरती बाबतचा दि. ०५/०९/२०२४ चा शासन निर्णय वाडीवस्तीवरील विदयार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने सदरचे दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा दि.२५ सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.*
*आज झालेल्या अखिल शिक्षक संघाच्या ऑनलाईन बैठकीत शासनाच्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे राज्यातील १५ हजार शाळांमधील १ शिक्षक कमी होवून १५ हजार शाळांमधील सुमारे २ लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याने सदरचे शासन निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावेत असे मत उपस्थित सर्व अखिल संघटना प्रतिनिधींनी व्यक्त केले.*
*बालकांच्या मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ अन्वये शिक्षक निश्चितीचे निकष सन २०११ पासून आपल्या राज्यात लागू करून १३ वर्षे झाली तरी अद्याप अधिनियमातील तरतुदीनुसार प्राथमिक स्तर इयत्ता १ ते ५ व उच्च प्राथमिक स्तर ६ ते ८ हा आकृतीबंध अध्याप लागू केलेला नाही. आकृतीबंध लागू करणेबाबत शासन निर्णयही झालेत मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या अधिनियमाचे उल्लंघन होत आहे.
असे असताना महाराष्ट्र शासनाकडून दि. १५/०३/२०२४ च्या शासननिर्णय द्वारे शिक्षक निश्चितीचे जाहीर केलेले निकष हे वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहेत.
त्या अनुषंगानेच आज झालेल्या अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य स्तरीय ऑनलाईन सभेत शासनाच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला.या सभेत ठरल्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अखिल शिक्षक संघाच्या सदस्यांनी राज्य स्तरीय आंदोलनात सक्रीय सहभाग घ्यावा.उद्यापासून सर्वांनी काळ्या फिती बांधून/लावून शालेय कामकाज नियमित करावे.तेच दिनांक 25/09/2024 रोजी सर्वांनी सामूहिक रजा आंदोलनात सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात येत आहे..

असे  अखिल महारष्ट्र प्राथमिक शिक्षक महासंघ चे  जिल्हा अध्यक्ष श्री.प्रवीण काटकर यांनी प्रसिद्ध केले ले पत्रात  म्हटले आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...