जि.प.शाळा, पूर्णगड नं.१ शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वेशभूषा ठरली आकर्षण.
रत्नागिरी ~ जि.प. शाळा पूर्णगड नं.१ ता.जि. रत्नागिरी शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेतील विद्यार्थी त्वमेव आंब्रे,यश चव्हाण विशेष आकर्षण ठरले. ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. तद्नंतर लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
लोकमान्य टिळकांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले . शाळेतील शिक्षकवृंद भारती तायशेटे, पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. केंद्रप्रमुख संजय राणे सर यांनी शुभेच्छा दिल्या.शाळेच्या या उपक्रमाविषयी शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले.