काताळे येथे दुचाकी म्हैशीवर आदळून तरुण मृत….

  • म्हैशीचे धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यु…. परिसरात शोककळा..

गुहागर – (वार्ताहर) – गुहागर तालुक्यातील काताळे येथील निखिल दिलीप कुळये (वय२३) यांचे आज आपघाती निधन झाले. तर त्यांचे सोबत असणारा सहील याच्याही डोक्याला मार लागला असून तो डेरवण येथे हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे.

सदर चां अपघात हा शुक्रवारी रात्री पडवे कात ळा वर घडला असे समजते. शुक्रवारी रात्री निखिल आणि साहिल हे दू चाकी वरून रोहिले येथे भजनाला गेले होते येताना त्यांचे मार्गात म्हैस आडवी आली आणि दुचाकी तिच्यावर आदळली, धडक एवढी जोरात होती की दोघे ही रस्त्याचे कडेला फेकले गेले. जोराच्या धडकेने निखिल जागीच बेशुद्ध पडला तर साहिल ही किरकोळ दुखापत झाली.

तातडीने त्यांना डेरवण येथे हॉस्पिटल ला हलवण्यात आले, मात्र निखिल हा मृत झाल्याचं समजताच आज काताळे गावावर ऐन गणेश उत्सवातच  शोक कळा पसरली आहे,

निखिल हा दिलीप कुळये यांचा एकुलता एक मुलगा होता आज त्यांच्याही घरातून तरुण मुलगा गेल्यान  दुःख व्यक्त होत आहे.  तर निखिल चे  मृत्यू ची बातमी समजताच त्याचे   मित्रपरिवार आणि नातेवाईक यांना खूप मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर वर आपला त्यांचें प्रती शोक व्यक्त केला आहे.

सदर चे अपघाताची नोंद डेरवण हॉस्पिटल कडून पोलीस स्टेशन ला नोद झाली आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें