भारताचा पाकिस्तान वर दणदणीत विजय..

भारताचा पाकिस्तान वर दणदणीत विजय…

ND vs PAK Hockey Match : भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत पाकिस्तानचा २-१ च्या फरकाने पराभव केला. भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरमध्ये दणदणीत दोन गोल करत संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानवरील या विजयासह भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली.

भारतीय हॉकी संघाने आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा २-१ असा पराभव करत स्पर्धेत सलग पाचव्या विजयाची नोंद केली आहे. भारताचे दोन्ही गोल कर्णधार हरमनप्रीत सिंगने केले. तर पाकिस्तानकडून एकमेव गोल अहमद नदीमने केला.

या विजयासह भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. तर पाकिस्तान संघाचा हा पहिलाच पराभव आहे. गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ यापूर्वीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें