आघाडीत होणारं विघाडी.? काँग्रेस चां कोंकणातील ३ जागांवर दावा….

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या कोकण विभागीय आढावा बैठकीत राजापूर.गुहागर व चिपळूण विधान सभा मतदार संघावर काँग्रेस ने आपला दावा केला आहे.

मुंबई – काँग्रेस ची कोकण विभागीय बैठक रमेश चन्नाथला महाराष्ट्र प्रभारी यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच नाना भाऊ पटोले अध्यक्ष प्रदेश काँग्रेस. विजय वडट्टीवार विरोधी पक्ष नेते. बाळासाहेब थोरात नेते विधीमंडळ , सतेज (बंटी ) पाटील गट नेते विधान परिषेद काँग्रेस , कोकण प्रभारी बी एम संदिप, नाना गवांडे उपाध्यक्ष प्रदेश , आमदार भाई जगताप,.माजी खासदार हुसेन दलवाई , आदी उपस्थित होते

. सदर कोकण विभागीय आढावा बैठकीचे आयोजन मुझफ्फर हुसेन कार्याध्यक्ष प्रदेश काँग्रेस महाराष्ट्र यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि नेटके नियोजन केले होते . बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत संभाव्य कोणत्या जागा काँग्रेस लढवणार आणि कोणत्या जागेबाबत आग्रही राहण्याचे याचा विचार जिल्हा निहाय आढावा बैठकीत घेण्यात आला . त्यात रत्नागिरी जिल्हातील राजापूर लांजा साखरपा, चिपळूण संगमेश्वर , गुहागर या तीन जागांवर काँग्रेस ने ठाम पणे दावा सांगितला आहे आणि प्रदेश काँग्रेस ने पण यावर सकारात्मक संकेत दिला आहे. सदर बैठकीत कोणत्याही परिस्थितीत रत्नागिरी जिल्हातील तीन जागा लढविण्याचे संकेत देण्यात आले असुन काँग्रेसच्या इच्छूक उमेदवारांनी तयारी करणेची आदेश देण्यात आले आहेत .

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें