ग्रामपंचायत वाटद मिरवणे अजब गजब ग्रामसभेला ठराव मंजूर….

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

*रत्नागिरी प्रतिनिधी :- श्री. निलेश रहाटे*

12 ऑक्टोबर 2005 रोजी देशामध्ये ‘माहितीचा अधिकार’ म्हणजेच Right to Information (RTI) कायदा लागू करण्यात आला व मा. श्री अण्णा हजारे हयांच्या प्रयत्न ना यश आले.या कायद्यानुसार सरकारच्या कोणत्याही कामाविषयीची किंवा निर्णया विषयीची माहिती मिळवण्याचा नागरिकांना अधिकार प्राप्त झाला .सरकारी तिजोरीतील जनतेचा पैसा कसा खर्च केला जातो याची माहिती घेण्याचा मूलभूत हक्क या कायद्याने मिळाला आहे.सर्वसामान्यांना त्यांच्या सामाजिक सुरक्षेच्या संदर्भातील, त्यांचा विकास, प्रगती या संदर्भातील माहिती सरकारकडून मागण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांनी तो बजावला पाहिजे. या कायद्याचा सामान्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, ही अपेक्षा पूर्ण होणे अधिक महत्त्वाचे आहे.परंतु ग्रुप वाटद मिरवणे ग्रामपंचायत मधून RTI द्वारे मागितलेली माहिती वेळेत मिळत नाहीच पण हया कायदयाला नवीन वळण लावलेले RTI मधून उगड झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे मुख्य प्रचार प्रमुख व पत्रकार निलेश रहाटे हे ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, व इतर शासकीय कार्यालय मधील योजने ची माहिती मागवत असतात व त्यातून ग्रामपंचायत कार्यालय मधील भ्रष्टाचार ही बाहेर आले आहेत परंतु त्याना कुठे तरी भिती दाखवण्यासाठी दि:-१३ मे २०२४ च्या झालेल्या ग्रामसभेला चक्क सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामसेवक, व गावचे पोलीस पाटील हयांनी ग्रामसभेला ठराव टाकून निलेश रहाटे व ग्रामस्थ, मतदार हयांना RTI द्वारे माहिती देऊ नये . माहिती कोणाला हवी असल्यास ग्रामपंचायत मध्ये येऊन चेक करून घेऊन जाणे सूचक हे तंटामुक्ती अध्यक्ष व त्या ठराव ला अनुमोदन देणारे हे गावचे पोलीस पाटील आहेत ठराव मध्ये असे ही लिहिले आहे की निलेश रहाटे हे कार्यालय मध्ये माहिती मागऊन कर्मचारी हयांना नाहक त्रास देत आहेत माहिती मागितल्या मुळे कार्यालय चा वेळ व पैसा हयाचे सुद्धा नुकसान होत आहे व त्या माहिती चे विडिओ बातम्या देऊन ग्रामपंचायत ची बदनामी करत आहे जर वेळ आली तर त्याच्या विरोधात ग्रामपंचायत नी न्यायालयात जावे अस ठराव मध्ये सांगितले आहे व हया ठराव ची प्रत वरिष्ट हयांना दाखल केली आहे. गावातील ग्रामपंचायत हे ग्रामीण भागातील ग्रामस्थ हयांचे मंत्रालय च आम्ही समजतो. पण असे संगमत करून ठराव टाकून हयांना नकी काय सिद्ध करायचे आहे हा पडलेला मोठा प्रश्न गावातील ग्रामस्थ व समाजसेवा करणाऱ्या ना पडला आहे.

✍️ *निलेश रहाटे RTI कार्यकर्ता व पत्रकार :-*
शासकीय कार्यालय मधील माहिती मागवणे हा प्रत्येक सामान्य माणसाचा हक्क आहे. ग्रामपंचायत मधील माहिती घेऊन बनवलेले व्हिडीओ व बातम्या हया झालेल्या भ्रष्टाचार च्या आहेत त्या गावातील ग्रामस्थ पर्यत आणणे हे प्रत्येक जागृत नागरिकाचे काम आहे. जनमाहिती अधिकारी ग्रामसेवक हयांच्या हलगर्जी मुळे अपीलात जाऊन मला माहिती ही ८-९ हजाराची ची अंदाजे फ्री मिळाली आहे.व त्याच्या मुळे नुकसान झाले असल्यास त्याच्या कडून वसूल करून घ्यावी. ह्या ठराव बाबत विभागीय आयुक्त व संबंधित कार्यालय हयांच्या कडे तक्रार दाखल केली आहे ते योग्य ती कारवाई करतील.

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]