शिवसेनेच्या गुहागर तालुका समन्वयक पदी राजेंद्र ऊर्फ राजा साळवी यांची नियुक्ती…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेनेच्या गुहागर तालुका समन्वयक पदी राजेंद्र ऊर्फ राजा साळवी यांची नियुक्ती..!

आबलोली (संदेश कदम).….

राजेंद्र साळवी यांना नियुक्ती चे पत्र देताना गुहागर तालुका प्रमुख दिपक कनगुटकर आणि जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण…

वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्यनेते, मुख्यमंत्री मान. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. शशिकांत चव्हाण, शिवसेना तालुका प्रमुख श्री. दिपक कनगुटकर, शिवसेना सचिव संतोष आग्रे यांच्या प्रेमळ आशिर्वादाने गुहागर येथील शिवसेना पक्षाच्या बैठकीत गुहागर तालुका कॉंग्रेस पक्षाचे युवकचे माजी तालुका अध्यक्ष आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच दुस-याच्या सुख – दु:खात आणि अडी अडचणीला नेहमी धाऊन जाणारे तरुण तडफदार नेतृत्व आणि गुहागर तालुक्यातील खोडदे गावचे सूपुत्र तसेच कामधेनू गो संवर्धन गो शाळा रत्नागिरी जिल्हा या संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा बैलगाडा असोसिएशन (रजि.) या संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेंद्र अनंत साळवी ऊर्फ राजा साळवी यांची शिवसेनेच्या गुहागर तालुका शिवसेना  गुहागर  समन्वयk नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्तीचे पत्र शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. शशिकांत चव्हाण, गुहागर तालुका प्रमुख श्री. दिपक कनगुटकर, सचिव श्री. संतोष आग्रे,उपतालुका प्रमुख श्री.प्रल्हाद विचारे,उपतालुका प्रमुख श्री. राजू सावरकर,श्री.महेश जामसूतकर, श्री. बबलू आग्रे,शिवसेना युवासेना उपतालुका प्रमुख(पडवे जि. प. गट) श्री. संदेश बबन काजरोळकर,खोडदे गणाचे विभाग प्रमुख श्री. प्रकाश भोजने, मासूचे शाखा प्रमुख श्री. विजय भोजने, पडवे गणाचे विभाग प्रमुख श्री. विशाल गोताड, पडवे गणाचे उप विभाग प्रमुख श्री. योगेश पालशेतकर, जेष्ठ शिवसैनिक आणि मासूचे माजी तंटामुक्ती समीती अध्यक्ष श्री. शशि भोजने यांचे प्रमुख उपस्थितीत देण्यात आले आहे. श्री. राजेंद्र अनंत साळवी ऊर्फ राजा साळवी यांची शिवसेनेच्या गुहागर तालुका शिवसैनिक समन्वयक पदी नियुक्ती झाल्यानंतर गुहागर तालुका शिवसेना पक्षात समाधान व्यक्त करण्यात येत असून गुहागर तालुक्यात जल्लोष साजरा करण्यात येत असून सर्वच स्तरातून राजेंद्र अनंत साळवी ऊर्फ राजा साळवी यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. यावेळी वंदनीय हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असा विश्वास राजेंद्र अनंत साळवी ऊर्फ राजा साळवी यांनी व्यक्त केला

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]