खोडदे येथे स्वच्छता भारत दिन उत्साहात साजरा…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खोडदे येथे स्वच्छता भारत दिन उत्साहात साजरा करण्यात आला…

राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी…

छाया- संदेश कदम

 

आबलोली (संदेश कदम)…..

गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत खोडदे येथे स्वच्छ भारत मिशन टप्पा २ , स्वच्छता हिच सेवा २०२४ अंतर्गत स्वच्छता भारत दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५५ वी जयंती आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती सरपंच कु. पुजा विलास गुरव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करतात आली. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री तसेच स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते पुजन, दिप प्रज्वलन करुन प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.तसेच स्वच्छते बद्दल आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी,पंतप्रधान लालबहादूर शास्त्री,संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.संदेश साळवी, श्री.राजेंद्र साळवी,श्री.विलास गुरव,श्री.राजेंद्र पंढरीनाथ साळवी, सरपंच कु. पुजा विलास गुरव, ग्रामपंचायत अधिकारी श्री.बाबूराव सुर्यवंशी यांनी मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ.सुनंदा निवाते, सौ. शुभांगी डिंगणकर, श्री.नाना साळवी, रविंद्र निवाते,श्री .विलास निर्मल आदी.विचार पीठावर उपस्थित होते.

यानंतर खोडदे गावामध्ये स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. या अभियानात स्वच्छ अंगण स्पर्धा, स्वच्छ शाळा सुंदर शाळा, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे, स्वच्छ व सुंदर परिसर तसेच नदी, नाले स्वच्छ करणे, शालेय विद्यार्थ्यांचे पथनाट्य व निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये स्वच्छ अंगण स्पर्धेत ४८ ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.यामध्ये खोडदे निवातेवाडी येथील गंगाराम लक्ष्मण निवाते, मोहितेवाडी येथील गणपत भानू पाडावे, झरेवाडी येथील राजेंद्र आनंद साळवी, गिरवणेवाडी येथील नंदकिशोर परशुराम देसाई, सहानवाडी येथील सौ. वैशाली विजय साळवी, बौद्ध वाडी येथील मनोज जानू पवार, देऊळवाडी येथील श्रीमती. सुनिती सुभाष वैद्य, खापलेवाडी येथील चंद्रकांत खापले, डिंगणकरवाडी येथील दत्ताराम डिंगणकर, गणेशवाडी येथील वैदहि विवेक चव्हाण, गोणबरेवाडी येथील उमा शंकर घाणेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच स्वच्छ शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत प्रथम क्रमांक जिल्हा परिषद आदर्श शाळा खोडदे नं. १ , व्दितीय क्रमांक पूर्ण प्राथमिक मोहितेवाडी शाळा, तृतीय क्रमांक प्राथमिक शाळा निवातेवाडी तसेच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवीण्यामध्ये खोडदे शाळा नं. १ मधील कु. जानवी नवनाथ कोळी, मोहितेवाडी शाळेमधील कु. स्वरा नितीन मोहिते यांनी प्रथम क्रमांक पटकावला

तसेच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवीण्यामध्ये गावातील बचत गटातील माऊली स्वयंसहाय्यता समूह बचत गट मोहितेवाडी, पंचशिल स्वयंसहाय्यता समूह बचत गट बौद्धवाडी ,किसान स्वयंसहाय्यता समूह बचत गट बौद्धवाडी, श्री. सदगुरू कृपा स्वयंसहाय्यता बचत गट गणेशवाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे तर टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनवीण्यामध्ये वैयक्तिक स्पर्धक सौ. रेशमी राजेंद्र साळवी, सौ. सुचिता सुनिल पवार, आशा स्वयंसेविका सौ. रश्मी राजेंद्र साळवी, सौ. मधुरा योगेश साळवी, सौ. पुजा रविंद्र निवाते, ग्रामपंचायत अधिकारी श्री. बाबूराव सुर्यवंशी, नितीन मोहिते, वैभव निवाते, कु्.पुनम सुनिल पवार ग्रामपंचायत कर्मचारी यांचा तसेच गावातील शाळांचे मुख्याध्यापक यामध्ये सौ. प्रिती गावंडे,अनंत पागडे, संतोष शिरकर,रुपेश धापसी, नितीन सुतार,प्राचार्य श्री.डि.डि.गीरी, तसेच ज्यांनी स्वच्छता अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता अशा गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती संत गाडगेबाबा समिती अध्यक्ष श्री. राजेंद्र पंढरीनाथ साळवी,उपाध्यक्ष श्री.विलास गुरव,ग्रामपंचायत अधिकारी श्री.बाबूराव सुर्यवंशी, ग्रामस्थ प्रणव डिंगणकर, रामचंद्र निवाते, शरद साळवी,तंटामुक्ती अध्यक्ष राजेश पवार, संदिप मोहिते, पोलीस पाटील सौ. योगिता पवार, श्री.संदेश साळवी, अंगणवाडी सेविका

सौ. श्वेता गुरव, सौ. अक्षता मोहिते, सौ. जयश्री साळवी,श्रीमती.प्राची साळवी, सौ. ज्योती निर्मल,शहानंद पवार,संतोष गुरव, विनायक पवार,यांचेसह चंद्रकांत बाईत, उच्च महाविद्यालय खोडदे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. या सर्वांचे ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तर गावाच्या वतीने सरपंच कु. पुजा विलास गुरव हिचा विशेष सत्कार करण्यात आला. सरपंच व कार्यक्रमाच्या अध्यक्ष कु. पुजा विलास गुरव हिने गावामध्ये स्वच्छता राखणे हि आपली सर्वांची जबाबदारी आहे स्वचछतेने माणूस निरोगी रहातो त्यामुळे प्रत्येकाने आपले घर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा असा संदेश देऊन सर्वांचे आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विलास गुरव यांनी केले.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]