मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषे चा दर्जा..,.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठाकीत निर्णय घेण्यात आला.

मराठीबरोबरच पाली, प्राकृत, असामी, आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट केलं आहे. ते म्हणतात, “मराठी भाषा हा देशाचा अभिमान आहे. या उत्तुंग भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. देशाच्या इतिहासात मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारशाचं योगदान या सन्मानामुळे अधोरेखित झालं आहे. भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्त्वाची आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अनेक लोकांना मराठी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळेल असा मला विश्वास वाटतो.”

अभिजात भाषा या भारताच्या पुरातन वारशाचं जतन करण्याचं काम करतात. तसंच प्रत्येक समुदायाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होते, यामुळे हा दर्जा मराठी भाषेला मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते.

एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिलेल्या पोस्टमध्ये ते पुढे म्हणतात, “अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे सहाय्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार!”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही अनेक वर्षं मागणी केली होती. ती मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली. याबद्दल त्यांचे आभार. हा सोन्याचा दिवस आहे. मा. पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप आभार. मी मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केले, पुरावे दिले, महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने आणि जगभरातील मराठी लोकांच्या वतीने मी मोदीजींचे आभार मानतो.

“लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला.

“नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!” अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

 

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]