शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी – प्रकृती उत्तम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी – प्रकृती उत्तम.

मुंबई :-. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांच्यावर आज तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले-.

उद्धव ठाकरे यांच्यावर काही वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. आज सोमवारी सकाळी त्यांना नियमित तपासणीसाठी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
उद्धव ठाकरे यांच्यावर अचानक अँजिओप्लास्टी झाल्याने सर्व शिवसैनिकांची काळजी वाढली होती. उद्धव ठाकरेंची प्रकृती कशी आहे याबाबत त्यांचे पुत्र आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून माहिती दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज सकाळी उद्धव ठाकरे यांची सर एच.एन रिलायन्स रुग्णालायत पूर्व नियोजित तपशीलवार तपासणी करण्यात आली. तुमच्या शुभेच्छांसह सर्व काही ठीक आहे. ते काम करण्यास आणि लोकांची सेवा करण्यास पूर्णपणे तयार आहेत.
दोनच दिवासंपूर्वी म्हणजे शनिवारी उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरून शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात संबोधन केले होते. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. आज सकाळी तपासणी दरम्यान त्यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे आढळले. त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्यावर याआधी २०१२ साली लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
काल (१३ ऑक्टोबर) मुंबईत विविध कामगार संघटनांची बैठक झाली होती. या बैठकीत शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आदी नेत्यांसह उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला देखील उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीकडून राज्य सरकारच्या कारभारावर गद्दारांचा पंचनामा या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले होते.
गद्दारांचा पंचनामा या पुस्तिकेच्या प्रकाशनानंतर उद्धव ठाकरे यांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली होती. फडणवीसांचे सरकार असताना नाना पटोले यांचे फोन टॅप केले जात होते. आता राजधानीत हत्या होत आहे, महिलांवर अत्याचार होत असतील तर राज्यात कायदा कुठे आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता.. आणि आज त्यांवर एन्जोप्लास्टी करण्यात आली असून ते उत्तम असल्याचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि सांगितले आहे

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]