निवडणूक आयोगाच्या घोषणेची शक्यता, आज दुपारी पत्रकार परिषद

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

निवडणूक आयोगाच्या घोषणेची शक्यता, आज दुपारी पत्रकार परिषद

 

दिल्ली – महाराष्ट्र आणि झारखंड या राज्याच्या विधानसभेची मुदत संपत असून निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर करणार याची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे.

आज दुपारी साडे तीन वाजता निवडणूक आयोगाने दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पत्रकार परिषद आयोजित केल्याचे निवेदन प्रसारित केले असून या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

आचारसंहिता आज की उद्या या बद्दलची प्रतीक्षा देखिल या मुळे संपुष्टात येऊन प्रत्यक्ष निवडणुकीची धुमाळी सुरू होईल असे चित्र दिसत आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]