मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्यावतीने आयोजित “येक नंबर” चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्यावतीने आयोजित “येक नंबर” चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद..!

आबलोली  (संदेश कदम)…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्फत गुहागर तालुक्यातील रसिक प्रेक्षकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित *”येक नंबर”* या मराठी चित्रपटाचे मोफत आयोजन सोमवारी शृंगारतळीतील राजलक्ष्मी चित्रमंदिर येथे करण्यात आले होते. या चित्रपटाचे दुपारी १२ ते ३ व ३ ते ६ या दोन्ही शोला रसिकांनी प्रचंड गर्दी होती. दोन्ही शो हाऊस फुल झाले होते. या शोसाठी आलेल्या सर्व रसिकांचे मनसे उपजिल्हाध्यक्ष
विनोद जानवळकर, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर व मनसे सैनिकांनी यथोचित स्वागत केलें. गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्यावतीने या दोन्ही शोचे मोफत आयोजन करण्यात आले होते. सदरचा चित्रपट यापुढेही चालू असणार असून या चित्रपटाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी व उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, जानवळे ग्रामपंचायत उपसरपंच वैभवी जानवळकर, सह संपर्क अध्यक्ष समीर जोशी, सुरेंद्र निकम, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे,उप तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, विभाग अध्यक्ष स्वप्निल कांबळे, उपविभाग अध्यक्ष सुहास चौगुले , सुशांत कोळंबेकर, प्रसाद विखारे, सचिन निकम,सुनिल मुकनाक, प्रशांत साटले ,निलेश गमरे यांनी विशेष मेहनत घेतली.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]