अखेर विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं….20नोव्हेंबर रोजी मतदान, 23 तारखेला निकाल.

 

अखेर विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं….

20नोव्हेंबर रोजी मतदान, 23 तारखेला निकाल

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

२९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असेल. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली येथील पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
दिनांक 29 ऑक्टोबर पर्यंत निवडणूक अर्ज भरता येतील तर 4 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्र विधानसभेसाठी भरलेले अर्ज मागे घेता येतील अर्जांची चांदणी दिनांक 30 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्यात येईल.
आता राजकीय पक्ष तिकडच्या याद्या कधी जाहीर करतात कोण उमेदवार कोणाचे तिकीट घेऊन निवडणुकीला सामोरा जातो तर किती ठिकाणी बंडखोरी होते याकडे सर्वसामान्य मतदारांचे लक्ष लागून राहणार आहे.
याच वेळी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांची देखील आता निवडणूक कामाची धामधूम सुरू होईल.
एकूणच महाराष्ट्राच्या निवडणुका वेळेत पूर्ण होऊन वेळेवर नवीन मुख्यमंत्री निवडून देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाने मुदतीत पार पाडण्याचे ठरवलेले दिसत असून यावेळीही अनेक सुविधा मतदारांसाठी देण्यात आले आहेत आणि मताचा टक्का वाढता राहील यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी काम करण्याचा इरादा जाहीर केला आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें