तळवली ग्रामदेवता सुकाईदेवी व इतर देवता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तळवली ग्रामदेवता सुकाईदेवी व इतर देवता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन..

छाया- मंगेश जाधव

तळवली – (मंगेश जाधव)  गुहागर तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले ग्रामदेवता सुकाईदेवी व इतर देवताची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.२३/१०/२०२४रोजी दुपारी ०१.००ते ०३.००या वेळेत तळवली सहाण ते सुकाई देवी मंदीर पर्यत भव्य दिव्य मिरवणूक त्यानंतर दुपारी०३ .००वाजता मूर्ती स्नान व इतर विधी त्यानंतर मूर्ती निद्रावस्थेत ठेवणे हे पहिल्या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.२४/१०/२०२४रोजी सकाळी ०८.००वाजता ग्रामदेवता श्री सुकाई देवी व इतर देवता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पुजा अर्चा आरती व तिर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ०१.००वाजता महाप्रसाद व संध्याकाळी ०७.००ते ०९.०० वा.हरिपाठ त्यानंतर रात्री ०९.००ते १०.०० भजन त्यानंतर रात्री १०. ३०वा.शक्ती तुरा डबल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी भक्तगणांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे देवस्थानचे सचिव अध्यक्ष यांनी आवाहन केले आहे.

Plz Join whatsup group ????https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]