दीपोत्सवात सेंट जोसेफ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले मतदार जनजागृती अभियान

दीपोत्सवात सेंट जोसेफ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले मतदार जनजागृती अभियान

वसई (गुरुदत्त वाकदेकर) : शनिवार दिनांक २ नोव्हेंबर २०२४ रोजी वसई किल्ला येथे १११११ दिव्यांचा मंगलमय दीपोत्सव साजरा करण्यात आला. सदर प्रकाशमान उत्सवात ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार (पश्चिम) येथील मराठी विभागाने मतदार जनजागृती अभियाना अंतर्गत १०० हून अधिक भाविकांच्या उपस्थितीत जगदीश संसारे लिखित व दिग्दर्शित ‘आली आली निवडणूक आली’ हे पथनाट्य सादर केले. ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष फ्रान्सिस तुस्कानो आणि पदाधिकारी यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थी सदर पथनाट्य सादर करू शकले.
प्राचार्य डॉ. कविता आल्मेडा आणि उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोजा यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.
आमची वसई या बिगर सामाजिक संस्थेच्या धनंजय वैद्य आणि ऋषिकेश वैद्य यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें