■ ९६ टक्के नाही,तर १०० टक्के राजन साळवी
पडवे ग्रामस्थांचा ठाम विश्वास
समिर शिरवडकर-रत्नागिरी
राजापूर:- ( पडवे) :-राजापूर लांजा साखरपा विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असुन,लगभगिने ,आणि आपल्या नेतृत्वाला खुष करण्यासाठी केलेले पक्ष प्रवेश कितीपत ग्रामस्थांना मान्य आहेत की नाही याची पुनःश्च प्रचिती पडवे भागात दिसून आले, काही दिवसांपूर्वी शिंदे गटात पडवे मधील गाव पॅनल सदस्य आणि सरपंच यांनी प्रवेश केला होता,आत्ता सर्व ग्रामस्थांनी मिळुन ही ग्रामपंचायत विराजमान केली होती,मात्र कोणताही ग्रामस्थांच मत न घेता,हा पक्ष प्रवेश झाल्याचे मत तेथील ग्रामस्थांच होत.
सदर, पक्ष प्रवेश बोगस असलेने आज दिनांक १७ नोव्हेंबर २४ रोजी सर्व ग्रामस्थांनी राजापूर लांजा साखरपा चे उमेदवार आणि शिवसेनेचे उपनेते राजन साळवी यांच्या समवेत पडवे वासीयांची बैठक पार पडली,त्या बैठीकत जे झाले ते आम्हा ग्रामस्थांना मान्य नाही,आणि आणि म्हणुन आम्ही ९६ टक्के नाहीतर १०० टक्के राजन साळवी याच्या पाठिशी ठाम आहोत असा निर्धार केला.







