डॉक्टर राजेंद्र पवार हे गुहागर तालुक्यातील वैद्यकीय सेवेतील जनसामान्यांचा आधारस्तंभ …. वकील सुशिल अवेरे.

डॉक्टर राजेंद्र पवार हे गुहागर तालुक्यातील वैद्यकीय सेवेतील जनसामान्यांचा आधारस्तंभ …. वकील सुशिल अवेरे.

तळवली (मंगेश जाधव) .डॉक्टर राजेंद्र पवार हे गुहागर तालुक्यातील वैद्यकीय सेवेतील जनसामान्यांचा आधारस्तंभ …. वकील सुशिल अवेरेआज गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ असेलेल्या शृंगारतळी येथे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे येथे *”कै.विष्णूपंत शंकर पवार यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त जीवन संजीवनी (CPR) कार्डीओ पल्मोनारी रिससिटेशन म्हणजेच हि एक आपत्कालीन उपचार प्रक्रिया आहे .जी एखाद्या व्यक्तीचा श्वास्श्वोवास किंवा हृदयाचे ठोके बंद झाल्यावर केली जाते . अत्यंत महत्वाच्या विषयावर जनसामान्यांमध्ये जनजागृती करणे विषयक प्रशिक्षण पवार कुटुंबीय , IMA चिपळूण, अपरांत हॉस्पिटल , लाईफ केअर हॉस्पिटल आणि गुहागर मेडिकल असोसिएशन यांच्या सयुंक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शन डॉक्टर जबले , डॉक्टर जोशी व डॉक्टर यांनी केले . मा. डॉक्टर राजेंद्र पवार व कुटुंबीय हे गेली १३ वर्षे सलग कै.विष्णूपंत शंकर पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दरवर्षी आरोग्यविषयक उपक्रम घेत असतात . आज आयोजित कार्यक्रमामध्ये अनेक ग्रामस्थ, डॉक्टर , विद्यार्थी व मान्यवरांनी हजेरी लावली अनेक मान्यवरांनी कै.विष्णूपंत शंकर पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला व त्याचबरोबर डॉक्टर पवार , दिपकशेठ पवार , भरत दादा पवार , शेखर पवार सर आणि पवार कुटुंबीय हे नेहमीच सामाजिक क्षेत्रात व व्यावसायिक क्षेत्रात करत असलेलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा उल्लेख केला गेला . गुहागर मेडिकल असोसिएशन मधील सर्वेच डॉक्टर गुहागर वासियांना उत्कृष्ट सेवा देत असल्याचे नमूद पाटपन्हाळे शृंगारतळी गावाचे उपसरपंच आसीम साल्हे यांनी करून उपस्थित मान्यवर राजेशजी बेंडल साहेब, निलेशजी सुर्वे , सुरेश दादा सावंत , डॉक्टर शिर्के , डॉक्टर भाले , मंगेश कदम , प्रमोदशेठ गांधी , मयुदादा कोळवणकर , मंगेशजी जोशी , गौरवजी वेल्हाळ , डॉक्टर मंदार आठवले व गुहागर मेडिकल असोसिएशन यांनी डॉक्टर पवार यांचे कार्याचा गौरव उदगार केला . एकंदरीत सध्यस्थितीत वैद्यकीय सेवेविषयी असणारी गुहागर तालुक्यातील आस्था असणारी सर्व मंडळीच्या निमित्ताने “डॉक्टर श्रीधर उर्फ तात्यासाहेब नातू यांचेविषयी हे चरित्र “जनी जनार्दन ” मा.धीरज वाटेकर साहेबांनी लिहलेल्या पुस्तकाची आठवण झाली , खरतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये येवू इच्छिणाऱ्या व आपण सर्वांनी वाचले पाहिजे असे हे पुस्तक असून तात्यांचा प्रतक्ष सहवास माझ्या सारख्या ज्या पिढीला अनुभवता आला नाही तो या पुस्तकामधून अनुभव करता येतो तर डॉक्टरना देव का संबोधतात याचा प्रत्यय येतो . असो एकंदरीत आज पार पडलेल्या या सामाजिक कामासाठी डॉक्टर राजेंद्र पवार व कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा व असे पवार कुटुंबीय ज्यांच्यामुळे घडले त्या कै.विष्णूपंत शंकर पवार यांना कोटी कोटी वंदन.

???? plz आमच्या whatsup group ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा ????????https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें