महाराष्ट्र केसरी पैलवानाचा व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; १२ डिसेंबरला होणार होते लग्न

महाराष्ट्र केसरी पैलवानाचा व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; १२ डिसेंबरला होणार होते लग्न

 

पुणे –  जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या धक्क्याने कुमार महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान विक्रम शिवाजीराव पारखी (वय ३०) याचा मृत्यूझाला आहे. हिंजवडी येथे बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेने मुळशी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पैलवान पारखी याचे १२ डिसेंबर रोजी लग्न होणार होते. मात्र काळाने त्याआधीच झडप घालून विक्रमचा मृत्यू झाल्याने पारखी कुटुंबावर आनंदाऐवजी दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

मुळशी तालुक्यातील माणगाव येथील भूमिपुत्र असलेल्या विक्रम पारखी याने कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपले नाव कोरून मानाची गदा मिळवली होती. २८ नोव्हेंबर २०१४ रोजी वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित ‘‘महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २०१४’’ झाली होती. त्यात विक्रम याने अजिंक्यपद मिळवले. विक्रम याने अनेक राष्ट्रीय पदके व किताब मिळवले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता.

 

झारखंड येथील रांचीमध्ये राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्याने ब्राँझ पदक मिळवले होते. मुळशीतल्या माले केसरी स्पर्धेचा विजेता बनून माले केसरी किताब व गदा मिळवली होती. अशा अनेक नामांकित कुस्ती स्पर्धेत माणगावचे आणि मुळशी तालुक्याचे नाव विक्रम पारखी याने उंचावले होते. हिंदकेसरी पैलवान अमोल बुचडे यांच्याशी त्याचे गुरू-शिष्याचे नाते होते. विक्रमचे वडील शिवाजीराव पारखी हे निवृत्त सैनिक असून त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात सहभाग घेतला होता.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें