बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह जानवळे (शृंगारतळी) येथे ६ डिसेंबर रोजी जनतेसाठी अस्थिकलश दर्शन

आबलोली (संदेश कदम) ….

बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,महामानव,बौधिसत्व,विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन आणि जनतेसाठी अस्थिकलश दर्शन असा संयुक्त कार्यक्रम शुक्रवार दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी गुहागर तालुक्यातील जानवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह जानवळे (शृंगारतळी) येथे आयोजित करण्यात आला असून गुरुवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १२:१५ वाजल्यापासून शुक्रवार दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत विश्वरत्न,विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पवित्र अस्थिकलश जनतेला दर्शनासाठी खुला ठेवण्यात आला असून या संपूर्ण कार्यक्रमाला आणि बुध्द पुजा पाठाला,बुद्ध वंदनेला आणि विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन सभेला गुहागर तालुक्यातील जनतेने बहुसंख्येने वेळेवर उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश (दादा) सावंत, कार्याध्यक्ष मारुती मोहिते, सरचिटणीस सुनिल गमरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]