वंचितचा १२डिसेंबरला पोलिस स्थानकावर धडक मोर्चा..             

वंचितचा १२डिसेंबरला पोलिस स्थानकावर धडक मोर्चा..             

 तळवली (मंगेश जाधव)- गुहागर तालुक्यातील नरवण येथील एका हाँटेल मध्ये वःचित बहूजन आघाडी चे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्या वर काहीनी प्राणघातक हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित पक्षातर्फे दि.१२डिसेंबर रोजी सकाळी चिपळूण तालुक्यातील गुढे फाटा ते चिपळूण पोलिस स्थानकात विराट मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व वंचितचे सर्वेसर्वा अँण्ड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर करण्याची शक्यता देखील वर्तविली जात असल्याने या आंदोलनाची धार तिव्र होणार आहे. वंचितचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी १२नोहेबर रोजी चिपळूण येथे मुंडण आंदोलन केले त्याचा राग मनात ठेवुन काहीनी १७नोहेबर रोजी नरवण येथे अण्णा जाधव यांच्या वर भ्याड हल्ला घडवुनआणला. मात्र हा हल्ला एकट्या अण्णा जाधवांर नसुन हा बहुजनांवर झालेला हल्ला आहे त्यामुळे त्या हल्याच्या विरोधात दि.१२डिसेंबर सकाळी १०.३०वा.गुढे फाटा ते बहादुर शेख नाका चिपळूण मार्गे डी वाय एस पी (पोलीस उपविभागिय आधिकारी चिपळूण)यांच्या कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें