संगमेश्वर रेल्वे स्थानकात तीन एक्स्प्रेसना थांबा द्या

संगमेश्वर रेल्वे स्थानकात तीन एक्स्प्रेसना थांबा द्या

३१ डिसेंबरची प्रशासनाला डेडलाईन

संगमेश्वर (वार्ताहर): गेल्या २४ जुलै रोजी संयुक्त बैठकीत तीन गाड्यांच्या थांब्या बाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देणाऱ्या कोकण रेल्वे प्रशासनाने ५ महिन्यात मागणी पूर्ण न केल्याने येत्या प्रजासत्ताक दिनी बेमुदत उपोषण सुरु करण्याचा इशारा निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी दिला आहे. ट्रेन नंबर ११००९/११०१० एलटीटी मडगाव एक्स्प्रेस, १९५७७/१९५७८ – जामनगर तिरूवल्ली एक्स्प्रेस, २०९०९/२०९१० कोचुवली पोरबंदर एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा मिळण्यासाठी जिमन यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला तसें निवेदन दिले असून आता महिनाभरात मागणी पूर्ण न झाल्यास थांब्यासाठीचा संघर्ष तीव्र करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. निवडणूक आचारसंहिता असल्याने आपण एवढे दिवस शांत होतो परंतु कोकण रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या मागणी ला गांभीर्याने घेताना दिसत नसल्याचे चित्र आहे.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें