गुहागर तालुक्यातील आंबेरे खुर्द पांचाळवाडी येथे श्री. दत्त जयंती उत्सवाचे आयोजन

गुहागर तालुक्यातील आंबेरे खुर्द पांचाळवाडी येथे श्री. दत्त जयंती उत्सवाचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) ….

गुहागर तालुक्यातील आंबेरे खुर्द येथील पांचाळवाडी येथे प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षीही श्री. दत्त जयंती उत्सवाचे शुक्रवार दिनांक १३,शनिवार दिनांक १४,रविवार दिनांक १५ रोजी आयोजन करण्यात आले आहे या दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आंबेरे खुर्द पंचक्रोशीतील जनतेने वेळेत बहुसंख्येने उपस्थित राहून संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन श्री. दत्त प्रासादिक मंडळ व महिला मंडळ आंबेरे खुर्द पांचाळवाडी, ता. गुहागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

श्री. दत्त जयंती उत्सवाचे निमित्त शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता श्रींच्या मुर्तीवर अभिषेक,आरती आणि तिर्थ प्रसाद त्यानंतर सायंकाळी ४ वाजता महिलांचे विवीध मनोरंजनाचे कार्यक्रम होतील आणि रात्रौ ९ वाजता आरती, भोवत्या आणि श्री. शेंबेकर गुरुजी यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता श्रींच्या मुर्तीवर अभिषेक, आरती, तिर्थ प्रसाद आणि सायंकाळी ५ वाजता श्री. शेंबेकर गुरुजी यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर श्री. दत्त जन्मोत्सव सोहळा आणि रात्रौ ८ वाजता मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि भजन तसेच रात्रौ १० वाजता आरती, भोवत्या

रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता श्रींच्या मुर्तीवर अभिषेक, होमहवन, आरती आणि त्यानंतर दुपारी १ वाजता सर्वांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रात्रौ ८ वाजता आरती, भोवत्या आणि शेंबेकर गुरुजी यांच्या किर्तनाचा कार्यक्रम त्यानंतर रात्रौ १०:३० वाजता रोहन पेडणेकर लिखित एकांकिका “पाझर”असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या संपूर्ण कार्यक्रमाला आंबेरे खुर्द पंचक्रोशीतील जनतेने वेळेत बहुसंख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन श्री. दत्त प्रासादिक मंडळ व महिला मंडळ आंबेरे खुर्द पांचाळवाडी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें