श्रीदत्तगुरु सेवा मंडळ उमराठ तर्फे दत्त जयंती साजरी होणार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीदत्तगुरु सेवा मंडळ उमराठ तर्फे दत्त जयंती साजरी होणार

( रौप्य महोत्सवानिमित्त दोन दिवशीय विशेष कार्यक्रमांचे आयोजन )

आबलोली (संदेश कदम) …..

गुहागर तालुक्यातील उमराठ गावातील श्रीदत्तगुरु सेवा मंडळ गोरीवलेवाडीतर्फे श्रीदत्त जयंती निमित्त यंदा रौप्य महोत्सवी कार्यक्रम शनिवारी १४ डिसेंबर व रविवारी १५डिसेंबर २०२४ रोजी दोन दिवशीय विशेष कार्यक्रम संपन्न होणार आहेत. शनिवारी १४ डिसेंबर २०२४ रोजी उमराठ गावात श्रीदत्तगुरु पादुका पालखीची भव्य मिरवणूक , विद्यार्थी सत्कार , मुलांचे रेकॉर्ड डान्स तसेच रविवारी १५ डिसेंबर रोजी आरोग्य शिबिर व रक्तदान कार्यक्रम , माहेरवाशीण व जावई सत्कार , लॉटरी लकी ड्रॉ सोडत , दिनदर्शिका प्रकाशन , लॉटरीमधील यशस्वीतांचा बक्षीस वितरण सोहळा , मान्यवर सन्मान तसेच रात्री ” कोकणचा साज संगमेश्वरीबाज ” असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

श्रीदत्त जयंतीनिमित्त श्रीदत्तगुरु सेवा मंडळ उमराठ गोरीवलेवाडीतर्फे यंदाच्या रौप्य महोत्सवी सोहळा शनिवारी १४ डिसेंबर व रविवारी १५ डिसेंबर २०२४ रोजी दोन दिवशी धार्मिक, सामाजिक , शैक्षणिक , आरोग्यदायी , सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून दत्त जयंती कार्यक्रम विविध समारंभांनी उत्साही व भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. शनिवारी १४ डिसेंबर २०२४ रोजी श्रीदत्तगुरु पादुका पालखीची उमराठ गावात भव्य मिरवणूक , श्री दत्तगुरुंचा नाम घोष , श्रीदत्तगुरु जन्मोत्सव , महिला हळदी कुंकू , महाप्रसाद (भंडारा ) रात्री ८.०० वाजता शालेय मुलांचे सत्कार व रात्री १०.०० वाजता मुलांचे रेकॉर्ड डान्स हे कार्यक्रम सादर होणार आहेत. तसेच रविवारी १५ डिसेंबर २०२४ रोजी स.११.०० वाजता शृंगारतळीमधील डॉ.राजेंद्र पवार दवाखाना व डेरवण ट्रस्ट यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर व रक्तदान कार्यक्रम , श्रीसत्यनारायण महापूजा , माहेरवाशीण व जावई सत्कार , दु. २.०० वा. लॉटरी लकी ड्रॉ सोडत , मान्यवरांचा सत्कार समारंभ , सायं.६.०० वा.महाप्रसाद (भंडारा )रात्री ८.०० वाजता मान्यवर सत्कार सोहळा , दिनदर्शिका प्रकाशन व लॉटरीमधील यशस्वीतांना बक्षीस वितरण तसेच रात्री १०.०० वा. ” कोकणचा साज संगमेश्वरी बाज ” या लोककलेचा कार्यक्रम सादर होणार आहे. रौप्य महोत्सवानिमित्त श्रीदत्तगुरु सेवा मंडळ उमराठ गोरीवलेवाडीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमांसाठी श्रीदत्तगुरूंच्या भक्तजनांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन श्रीदत्तगुरु सेवा मंडळ उमराठ गोरीवलेवाडीचे मुंबई अध्यक्ष रमेश यशवंत गोरीवले , सचिव चेतन शांताराम गोरीवले , कार्याध्यक्ष संदीप हरिश्चंद्र गोरीवले , स्थानिक अध्यक्ष महेश लक्ष्मण गोरीवले , सल्लागार शांताराम रत्नू गोरीवले, महिला मंडळ अध्यक्ष सविता संजय गोरीवले व पदाधिकारी तसेच वाडीतर्फे आवाहन करण्यात आले.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]