आ.किरण सामंत यांनी दाभोळे जि. प. गटातील साखरपा विभागातील नियोजित कामांचा घेतला आढावा

मी जनतेचा आमदार आहे आपल्या समस्या थेट सांगा, त्या नक्की सोडवेन—आमदार किरण सामंत

 

आ.किरण सामंत यांनी दाभोळे जि. प. गटातील साखरपा विभागातील नियोजित कामांचा घेतला आढावा

 

साखरपा — माजी आमदारांप्रमाणे मी नाही, मी जनतेचा आमदार आहे तुमची विकास कामे किंवा समस्या मला सांगा असे प्रतिपादन राजापूर लांजा साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी विकास कामांचा आढावा व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी साखरपा येथे आले असताना केले.

प्रथम साखरपा बस स्थानकाच्या वाढीव इमारतीच्या कामाची पाहणी करून काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना ठेकेदार कंपनीला देण्यात आल्या व वाढीव कामांसाठी निधी देणार असे सांगितले .

तसेच शिवसेना नेते संजय सुर्वे यांच्या साखरपा येथील निवासस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी यांना बोलावून रुग्णाला लागणारी औषधे व इतर सुविधा वेळेत मिळाल्या पाहिजेत व काही समस्या असल्यास मला कळवा त्या मी पूर्ण करीन अशी सूचना दिली.

त्याचबरोबर कित्येक वर्षे या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन परिचर नसल्याकारणाने प्रेताची हेळसांड होत आहे ही बाब आमदार सामंत यांना समजताच जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना फोन लावून लांजा राजापूर व साखरपा या ठिकाणी शवविच्छेदन परिचराकांच्या नियुक्ती करा अशा सूचना देण्यात आल्या.

तसेच भडकंबा दत्तवाडी येथील दत्त जयंती उत्सवास भेट देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व लवकरच तेथील विकासकामे पूर्ण करण्याचा शब्द दिला.

 

साखरपा पंचक्रोशीतील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आमदार सामंत यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

यावेळी शिवसेना नेते संजय सुर्वे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश पत्त्याने, विलास बेर्डे, बापू शेट्ये, राजेश कामेरकर, बापू लोटणकर ,प्रसाद आपंडकर, काशिनाथ सकपाळ, शुभम गांधी, पिंट्या देवळेकर, सागर शिंदे, रुपेश कदम, महेश पावसकर, अमर शिंदे, अंकुश सुर्वे, हेमंत शिंदे, संतोष चव्हाण ,संतोष भिंगार्डे, दीपक माने,बाळू जामसांडेकर शशिकांत सावंत, मनोज चव्हाण, यश कोळवणकर, पत्तू शेडगे, गणेश वायदंडे तसेच भाग्यश्री सुर्वे, रेश्मा परशेटे, नेत्रा शिंदे, संध्या गांगण ,प्रज्ञा बेर्डे, नेहा सावंत, रश्मी थरवळ व अनेक कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें