गुहागर तळवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन विहिरीचे पं. स.गुहागर गट विकास अधिकारी श्री पी.पी.केळस्कर यांच्या हस्ते भूमी पूजन संप्पन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर तळवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन विहिरीचे पं. स.गुहागर चे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी (गट अ) मा. श्री पी.पी.केळस्कर यांच्या हस्ते भूमी पूजन संप्पन्न

तळवली (मंगेश जाधव)..

गुहागर ग्रामपंचायत तळवली येथे आज पंचायत समिती गुहागर चे गट विकास अधिकारी (गट अ) श्री पी.पी.केळस्कर यांनी भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना श्री अनिल पवार यांच्या सिंचन विहिरीचे लाभार्थी यांच्या शेतावर जाऊन भूमी पूजन केले तसेच गावातील मोदी आवास व रमाई आवास घरकुले यांची पाहणी, फळबाग लागवड, बायोगॅस, mregs विहीर, कच्चे बंधारे, जलजीवन कामे,टाकी इत्यादी कामांची पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत कृषी अधिकारी श्री आर.के.धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी श्री. एस. कांबळे, कृषी विस्तार अधिकारी श्री प्रतीक जाधव, ग्रामपंचायत अधिकारी श्री एस.आर. बागुल, ग्रा. पं. कर्मचारी, लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]