दापोलीतील ‘द फर्न समाली रिसॉर्ट’च्या कामगाराचा मृत्यू. आकस्मित मृत्यू.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दापोलीतील ‘द फर्न समाली रिसॉर्ट’च्या कामगाराचा मृत्यू. आकस्मित मृत्यू.

दापोली : दापोली शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या ‘द फर्न समाली रिसॉर्ट’ येथे कामाला असणाऱ्या राजू कोळी या ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी घडली.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू कोळी हा समाली रिसॉर्टमध्ये कार्यरत होता. तो जयपूर- राजस्थान येथील मूळचा राहणारा होता. तो ११ डिसेंबर रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास हॉटेलमधून जेवून त्याच्या रूमवर जाऊन झोपला. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत तो झोपूनच होता. जेवण करण्यासाठीही न उठल्यामुळे त्याला त्याचा मित्र विजयकुमार हा ड्युटी संपवून रूमवर आल्यावर उठवण्यासाठी गेला तेव्हा तो काहीच हालचाल करीत नव्हता म्हणून त्याला तत्काळ हॉटेलच्या गाडीतून दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तो मृत असल्याचे घोषित केले. दापोली पोलीस ठाणेत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]