खेड येथील गरम पाण्याच्या कुंडाने घेतला मोकळा श्वास

खेड येथील गरम पाण्याच्या कुंडाने घेतला मोकळा श्वास

 

खेड : दयनीय अवस्था झालेल्या खेड शहरातील गरम पाण्याच्या कुंडाच्या परिसरातील स्वच्छता करण्यासाठी महाराजा प्रतिष्ठानने पुढाकार घेतला होता. त्यामुळे या कुंडाने मोकळा श्वास घेतला.

 

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक गडकोट तसेच ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यापैकी खेड तालुक्यातील गरम पाण्याचे कुंड हे एक आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे कुंड गेली अनेक वर्ष दुर्लक्षित आहे. किंबहुना खेडमध्ये गरम पाण्याची कुंडं आहेत. याची अनेकांना कल्पनाही नाही. तालुक्यात कार्यरत असलेल्या महाराजा प्रतिष्ठानच्यावतीने या कुंडाला भेट देऊन तिथे पाहणी केली असता प्रचंड मोठे गवत, दारूच्या बाटल्या आणि कचऱ्याने हे कुंड पूर्णपणे झाकून गेले होते. हे ठिकाण तळीरामांचा अड्डा बनलेले होते.

खेड येथील गरम पाण्याच्या कुंडाने घेतला मोकळा श्वास

दारूच्या बाटल्यांचा खच तिथे पडलेला होता. महाराजा प्रतिष्ठानने त्या कुंडाची स्वच्छतामोहीम हाती घेतली. त्यानुसार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत वैद्य, उपाध्यक्ष डॉ. परेश मळणगावकर तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सचिन वानखेडे, प्रणव मापूसकर, नरेंद्र जाधव, गणेश सानप, राहुल तुगावकर यांनी सर्व परिसर स्वच्छ केला. त्यामुळे गरम पाण्याच्या कुंडाने मोकळा श्वास घेतला आहे. कुंडाची योग्य व्यवस्था प्रशासनामार्फत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

खेड येथील गरम पाण्याच्या कुंडाने घेतला मोकळा श्वास

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें