आंबेडकरी आई’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आंबेडकरी आई’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन 

 

तळवली (मंगेश जाधव)

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या स्त्रियांनी आपल्या मुलींना हे विचार देऊन त्यांना ‘कर्तृत्ववान व्यक्ती’ म्हणून घडवले. अशा ४२ आयांबद्दल त्यांच्या कर्तृत्ववान लेकींनी लिहिलेला ऐतिसाहिक दस्तावेज म्हणजे प्रा.आशालता कांबळे, डॉ.श्यामल गरुड संपादित ‘आंबेडकरी आई” हा भव्य ग्रंथ होय. आंबेडकरी स्त्री संघटन आयोजित ‘आंबेडकरी आई’ या पुस्तकाचा प्रकाशन सभारंभ शनिवार दिनांक २८ डिसेम्बर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता मुबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर पूर्व येथे आजोजित केला आहे.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी डॉ. भालचंद्र मुणगेकर असणार असून प्रमुख वक्ते डॉ. सिसिलिया कार्व्हालो , प्रा. डॉ. अजित मगदूम आणि डॉ. प्रज्ञा दया पवार हे मान्यवर उपस्थति राहणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन नंदा कांबळे आणि सुरेखा पैठणे करणार आहेत. या कार्यक्रमास उपिस्थत राहणाचे आवाहन आंबेडकरी आईच्या ४२ लेकींनी केले असल्याचे एका निवेदन पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]