तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी वेलदूर नवानगर शाळेतील विद्यार्थ्यांची निवड,,,,,,,,,,,

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी वेलदूर नवानगर शाळेतील विद्यार्थ्यांची निवड

 

गुहागर -शैक्षणिक वर्ष 2024/25 मधील बीट स्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अंजनवेल येथे पार पडल्या. यामध्ये वेलदूर नवानगर शाळेतील विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी सांघिक व वैयक्तिक खेळामध्ये निवड करण्यात आली. गुहागर तालुका मोठा गट मुले कबड्डी संघात अर्णव श्रीकांत रोहिलकर (कर्णधार) रुद्र कृष्णा कोळथरकर ,अथर्व दिपक वरवटकर व यवन संतोष नाटेकर, यांची निवड करण्यात आली. गुहागर तालुका लहान गट मुले कबड्डी संघामध्ये नक्ष सागर दाभोळकर याची निवड करण्यात आली. गुहागर तालुका लहान गट मुले खो-खो संघामध्ये नक्ष सागर दाभोळकर व आरुष तुकाराम कोळथरकर यांची निवड करण्यात आली. कबड्डी मोठा गट मुली संघामध्ये आर्या पुंडलिक नाटेकर हिची निवड करण्यात आली.त्याचबरोबर क्रिकेट संघामध्ये अर्णव श्रीकांत रोहीलकर व अथर्व दीपक वरवटकर यांची निवड करण्यात आली.तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शिल्पा कोळथरकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा, उपाध्यक्षा संजना फुणगुसकर, श्री. नारायण रोहिलकर पाटील रोहिलकरवाडी, श्री शंकर कोळथरकर पाटील विठ्ठलवाडी,श्री. संदीप वणकर पाटील वणकरवाडी,श्री. अली सोलकर पाटील मोहल्ला, शाळेचे मुख्याध्यापक डॉ.श्री मनोज पाटील, सौ. अंजली मुद्दमवार उपशिक्षिका , सौ. धन्वंतरी मोरे उपशिक्षिका, सौ.सुषमा गायकवाड उपशिक्षिका, सौ. अफसाना मुल्ला पदवीधर शिक्षिका,तसेच शाळा व्यवस्थापन समिती माता पालक संघ शिक्षक पालक संघ यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य व पदाधिकारी, वेलदूर नवानगर ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]