रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली यांचे वतीने नववर्षाच्या प्रारंभी आबलोलीत विवीध कार्यक्रमांचे आयोजन

रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली यांचे वतीने नववर्षाच्या प्रारंभी आबलोलीत विवीध कार्यक्रमांचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) 

रत्नागिरी जिल्हा शिवसेना प्रणित रिक्षा, टॅक्सी व विद्यार्थी वाहतूक सेना पुरस्कृत रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली, तालुका गुहागर या रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी नुतन वर्ष २०२५ या वर्षाच्या स्वागतासाठी, नुतन वर्षाच्या प्रारंभी बुधवार दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजी विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ०८:०० वाजता श्री. सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली असून सकाळी ०९:०० वाजता महाआरती व तिर्थप्रसाद, सकाळी ११:०० वाजता अधिकृत रिक्षा थांब्याचे मान्यवरांचे हस्ते उदघाटन संपन्न होणार आहे तर सायंकाळी ०७:०० वाजता आबलोली – खोडदे गावातील स्थानिक मंडळांचे सुस्वर भजन आयोजित करण्यात आले असून रात्रौ ०९:०० वाजता लकी ड्रॉ सोडतीचा भाग्यवान विजेत्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.त्यानंतर रात्रौ १०:०० वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील, संगमेश्वर तालुक्यामधील श्री. ग्रामदेवता लोककला नाट्य – नमन मंडळ यांचे बहुरंगी बहूढंगी नमन सादर करण्यात येणार असून “सैतानी डाव” अर्थात “गनिमी कावा” हे वगनाट्य सादर होणार आहे तरी या संपूर्ण कार्यक्रमाचा आबलोली पंचक्रोशीतील जनतेने मोफत लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली या संघटनेचे अध्यक्ष सुभाष कदम, उपाध्यक्ष गोपीनाथ शिर्के, कोषाध्यक्ष अनिल साळवी, सचिव अजित मोहिते, सह.सचिव प्रशांत कदम, सल्लागार प्रविण भंडारी, धनदिप साळवी, प्रकाश चाचे, दौलत शिर्के, दिनेश पागडे, सदस्य योगेश साळवी, तुषार भोजने, समीर चाचे, मंगेश मास्कर, अमित निवाते, सर्वेश पवार, संदिप दिवेकर,मनोज भोजने, दत्ताराम साळवी, मनोज पवार, अमित करंजकर, प्रशांत गोणबरे, प्रशांत सुर्वे, राजेश मोहिते, ऋषिकेश झगडे, निरंजन सुर्वे, सागर चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें