पावस येथे मोबाईल टॉवर कंपनीच्या बॅटऱ्यांची चोरी, मोबाईल सेवा खंडीत.

पावस येथे मोबाईल टॉवर कंपनीच्या बॅटऱ्यांची चोरी, मोबाईल सेवा खंडीत.

 

रत्नागिरी : तालुक्यातील पावस- गोडबोलेवाडी येथील एअरटेल कंपनीच्या टॉवरच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना घडली आहे. तब्बल ७९ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्याने डल्ला मारल्याचे बोलले जात आहे. यासंबंधी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना २८ डिसेंबरला सायंकाळी पाच ते १ जानेवारी दुपारी साडेबारा या दरम्यान घडल्याचे सांगण्यात येत आहे.

वीज गेली की परिसरातील मोबाईल सेवा बॅटरी अभावी बंद होते याचा ग्राहकांना मोठा फटका बसतोय.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें