जिल्ह्यात कासवाच्या सात घरट्यांचे संरक्षण… विणीचा हंगाम लांबला!जिल्ह्यात कासवाच्या सात घरट्यांचे संरक्षण… विणीचा हंगाम लांबला!

जिल्ह्यात कासवाच्या सात घरट्यांचे संरक्षण… विणीचा हंगाम लांबला!

 

रत्नागिरी : वातावरणातल्या होणाऱ्या बदलांमुळे यावर्षीचा कासव विणीचा हंगाम लांबला आहे. विणीच्या हंगामाला नोव्हेंबरमध्ये सुरवात झाली असून गुहागर वरचापाट येथील समुद्रकिनारी एक घरट संरक्षित करण्यात आले आहे. त्यानंतर म्हणजे डिसेंबरमध्ये तयार झालेली घरटी धरून जिल्ह्यात कासवांच्या अंड्यांची एकूण सात घरटी संरक्षित केली आहेत, अशी माहिती जिल्ह्याचे कांदळवन विभागाचे अधिकारी यांनी दिली.

 

यावर्षी पावसाचा हंगाम थोडा लांबल्याने थंडीचा हंगाम नोव्हेंबरमध्ये थोडा उशिराच सुरू झाला. वातावरणातील वारंवार होणाऱ्या बदलांमुळे विणीचा हंगाम लांबला. तरीही नोव्हेंबरमध्ये गुहागर येथील वरचापाट येथील किनारपट्टीवर कासवाचे एक घरटे संरक्षित करण्यात आले. त्यानंतर डिसेंबरमध्ये अजून सहा ठिकाणी कासवाच्या अंड्याची घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. गुहागरमधील तवसाळ, गणपतीपुळे व राजापूर तालुक्यातील वेत्ये येथे प्रत्येकी एक घरटे संरक्षित केले आहे. दापोली तालुक्यामध्ये आंजर्ले आणि दाभोळ या ठिकाणी एक घरटे संरक्षित केले आहे. साधारण ४५ ते ५५ दिवसांनी ही पिले बाहेर येतील, तेव्हा कासवमित्र त्यांना समुद्रात सोडतील, असे ठाकूर यांनी सांगितले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें