तळवली हायस्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी… 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तळवली हायस्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी… 

तळवली (मंगेश जाधव)…..

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता. गुहागर जि. रत्नागिरी या प्रशालेत शुक्रवार दि. 12 जानेवारी 2025 रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस तर जेष्ठ शिक्षिका सौ.नाईक मॅडम यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. मधुरा काणेकर,कु.सोनल जोशी, इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु. स्वरा साळवी या विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली. तसेच जेष्ठ शिक्षक श्री. साळुंके सर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित विचार व्यक्त केले. तर सौ.कांबळे मॅडम यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांनी भाषणे केलेल्या विद्यार्थ्यांना व मार्गदर्शन करणा-या वक्त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.त्यानंतर राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाने आयोजित केलेल्या कथाकथन व शुद्ध लेखन-हस्ताक्षर स्पर्धेत सुयश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमास जेष्ठ शिक्षक श्री.साळुंके सर,सौ.नाईक मॅडम,श्री.कुळे सर,प्रा जड्याळ सर, सौ.कांबळे मॅडम,प्रा.आयरे मॅडम,प्रा.सावंत मॅडम,लिपिक श्री.कदम सर, श्री.अक्षय चव्हाण,श्री.प्रणय आरोलकर व इतर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. श्रीनाथ कुळे सर यांनी केले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.अपूर्वा कुळे हिने केले तर स्वागत व सूत्रसंचालन श्री. श्रीनाथ कुळे सर यांनी केले.तर प्रा. अमोल जड्याळ सर यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]