मुंबई-नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात; ३ जण जागीच ठार; १४ जण जखमी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

मुंबई-नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात; ३ जण जागीच ठार; १४ जण जखमी

 

नाशिक – महामार्गावर आज पहाटे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील आठ जणांची प्रकृती चिंतानजक आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

 

मुंबई- नाशिक महामार्गावर शहापूर येथे आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास कंटेनर, ट्रक आणि खाजगी बससह पाच वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक महामार्गावर शहापूरातील गोठेघरजवळ हा भीषण अपघात घडला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, मालवाहतूक ट्रकला पाठीमागून येणाऱ्या चार वाहनांनी धडक दिली, असे सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. हा अपघातात पाचही वाहनाचे नुकसान झाले आहे.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]