विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करा — आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी 

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करा — आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी 

नवी मुंबई (मंगेश जाधव)

पनवेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी त्या विमानतळास दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबत कार्यवाही व्हावी,अशी आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना निवेदनही दिले आहे.

 

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि,लोकनेते स्व. दि. बा. पाटील साहेब यांचा १३ जानेवारी हा जन्मदिवस. दि. १३ जानेवारी २०२५ रोजी स्व. दि. बा. पाटील साहेब यांची ९९ वी जयंती साजरी झाली त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे मुंबईला पर्याय म्हणून ठाणे, पनवेल, उरण तालुक्यातील गावांमध्ये नवी मुंबई निर्माण करण्याकरिता प्रकल्प राबविण्यात आला. हा प्रकल्प राबवित असताना येथील स्थानिक कष्टकरी, शेतकरी, प्रकल्पग्रस्त वर्ग विस्थापित न होता, त्यांना यथोचित न्याय मिळण्यासाठी स्व.दि.बा. पाटील साहेबांनी भूमिपुत्रांसाठी केलेल्या संघर्षाची इतिहासाने नोंद घेतली आहे.केवळ त्यांनी केलेल्या संघर्षामुळेच इथला स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त आज ताठ मानेने उभा आहे व त्याकरिता या तालुक्यातील प्रकल्पग्रस्त हे कायमस्वरूपी त्यांचे ऋणी आहेत. अशा या दिवंगत लोकनेत्याचे नाव याच परिसरात विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास द्यावे अशी आग्रही मागणी येथील भूमिपुत्र,प्रकल्पग्रस्त तसेच लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत आहे.स्व.दि.बा.पाटील साहेबांचे नाव या विमानतळाला देण्यात यावे याकरिता गेली अनेक वर्षे प्रकल्पग्रस्तांकडून विविध बैठका, पत्रव्यवहार तसेच विविध आंदोलनांमार्फत सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. या प्रयत्नांमुळेच दि. बा.पाटील साहेब यांचा कर्तृत्वाचा योग्य सन्मान होण्याच्या दृष्टीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ हे नाव देण्याचा प्रस्ताव आपल्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारने केला आहे,असे नमूद करत त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत त्यांचे आभारही मानले आहेत.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें