टेरवचे महेश कदम, स.पो. नि. मुंबई यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल स.पो. आयुक्तांकडून सन्मान..

 

 

टेरवचे महेश कदम, स.पो. नि. मुंबई यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल स.पो. आयुक्तांकडून प्रशंसापत्र प्रदान–.

 

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील टेरव गावातील दत्तवाडीचे सुपुत्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश सुरेशराव कदम, विलेपार्ले पोलीस ठाणे, मुंबई यांनी अथक परिश्रम, कौशल्य, सातत्य व चिकाटीने सिने अभिनेते सैफ अली खान यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या बांगला देशी नागरिकत्व असलेल्या आरोपीला अटक करणाऱ्या पथकामध्ये सहभागी होऊन ३५० सरकारी व खाजगी सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करून, तांत्रिक कौशल्याचा वापर व दिवस रात्र तपास करून आरोपीस शिताफीने अटक केले.

 

सदर उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्माननीय सत्यनारायण चौधरी पोलिस सह. आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) बृहन्मुंबई यांनी प्रशंसापत्र देवून महेश कदम यांचं गौरव केला आहे. तसेच जय भवानी ग्रामोन्नती मंडळ मुंबई, सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत टेरव, मंदिर व्यवस्थापन समिती टेरव, सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट मुंबई, दसपटी क्रीडा मंडळ मुंबई, रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट मजरे दादर, समस्त ग्रामस्थ टेरव यांनी व इतर अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

 

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें