वेलदूर नवानगर शाळेमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

वेलदूर नवानगर शाळेमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

 

गुहागर -(वार्ताहर)  तालुक्यांतील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर मराठी या शाळेमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमा चे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्री. मनोज पाटील सर यांनी भूषविले.यानंतर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या उपशिक्षिका सौ.गायकवाड मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेश्री.मारुती रोहिलकर यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक डॉ.श्री.मनोज पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी आरोही रोहिलकर हिने नेताजी बोस या विषयी भाषण केले.यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनोज पाटील सर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या महान कार्याबद्दल माहिती दिली.

त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. मारुती रोहिलकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मुल्ला मॅडम यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.मोरे मॅडम यांनी केले.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें