गुहागर तालुक्यातील खोडदे मोहिते वाडी येथे शनिवार दि. २५ रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि श्री. सत्यनारायणाची महापुजा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर तालुक्यातील खोडदे मोहिते वाडी येथे शनिवार दि. २५ रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि श्री. सत्यनारायणाची महापुजा.

ज्ञानदीप सेवा मंडळ आणि माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील खोडदे मोहिते वाडी येथील ज्ञानदीप सेवा मंडळ आणि माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा खोडदे मोहिते वाडी या शाळेतील शालेय विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा, वार्षिक स्नेह संमेलन आणि श्री. सत्यनारायणाची महापुजा या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता श्री. सत्यनारायण महापुजा, दुपारी १:३० वाजता सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर सायंकाळी ४:०० वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ त्यानंतर रात्रौ ८:३० वाजता मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच रात्रौ ९:३० वाजता मान्यवरांचे सत्कार त्यानंतर रात्रौ १०:३० अप नेक्स्ट प्रोडक्शन मुंबई यांची मराठी नाटिका “दृष्टी” हि नाटिका तसेच देशभक्ती गाणी आणि नृत्य असा भरगच्च कार्यक्रम सादर होणार असून या संपूर्ण कार्यक्रमाला खोडदे पंचक्रोशीतील जनतेने वेळेत उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन ज्ञानदीप सेवा मंडळ मौजे खोडदे मोहिते वाडी या मंडळाचे मुंबईचे अध्यक्ष प्रशांत जनार्दन मोहिते, स्थानिक अध्यक्ष सदानंद तुलाजी मोहिते मुंबईचे सेक्रेटरी यशवंत जानू मोहिते, स्थानिक सेक्रेटरी नितिन केशव मोहिते,जेष्ठ मार्गदर्शक काशिनाथ गोविंद मोहिते, जनार्दन मोहिते,काशिराम मोहिते,कृष्णा कावणकर,शंकर तांबे,दत्ताराम धनावडे,आदी. कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]