प्रजासत्ताकदिनी राजपथावर मार्गताम्हाने महाविद्यालयाचे कोळी नृत्य

प्रजासत्ताकदिनी राजपथावर मार्गताम्हाने महाविद्यालयाचे कोळी नृत्य

महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी, ‘अथर्व वेद परंपरा कला मंच रत्नागिरी’चे सहाय्य

   गुहागर  – (मगेश जाधव- तळवली)

दिल्ली येथे यावर्षी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला व वाणिज्य महाविद्यालयाला मिळाली आहे. कोकणचे प्रसिद्ध कोळी नृत्य सादरीकरण करण्यात करणार आहे.

‘अथर्व वेद परंपरा कला मंच रत्नागिरी’ यांच्या सहाय्याने २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात आपल्या कला-कौशल्याचा ठसा या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी उमटवणार आहेत. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राने कोकणातील कोळी नृत्य सादरीकरणाला प्राधान्य दिले असून महाराष्ट्रातून निवडलेल्या ६० कलाकारांनी सादरीकरणामध्ये सहभाग घेतला आहे.

या कोळी नृत्यामध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम वर्षात शिकत असणारे प्रगती घडशी, नेहा कोतवडेकर, तन्वी मोहिते व तृतीय वर्षातील भक्ती गुजर, समृद्धी गुजर, अंकिता पवार गेल्या महिन्याभरापासून दिल्ली येथे दिग्गज दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली कोळी नृत्याचा सतत सराव करत आहेत. मार्गताम्हाने सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर स्वत:ची छाप पाडण्यासाठी मिळालेल्या या संधीबाबत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून या विद्यार्थिनींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

हा महाविद्यालयाच्या इतिहासातील अभिमानास्पद क्षण ठरणार आहे. महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग नेहमीच दुर्गम भागातील कलागुणांना वाव देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. यामुळे विद्यार्थिनींना आपली कला राष्ट्रीय पातळीवर सादर करण्याची संधी मिळाली आहे. या गौरवपूर्ण प्रसंगाने महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला असून, या विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. अथर्व वेद परंपरा कला मंच रत्नागिरी चे प्रमुख श्री लक्ष्मण पडवळ, श्री प्रवीण कदम , श्री प्रथमेश कोतवडेकर यांचे याबाबतीत महाविद्यालयाला विशेष सहकार्य मिळाले आहे.

विद्यार्थिनींच्या या सहभागाबाबत मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब यादव यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें