रासायनिक उद्योग क्षेत्रातील रोजगार संधीचा लाभ घेण्याचे आवाहन गुहागर ( आशिष कर्देकर)

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रासायनिक उद्योग क्षेत्रातील रोजगार संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

गुहागर ( आशिष कर्देकर)

मिटकॉन फोरम फॉर सोशल डेव्हलोपमेंट,कलेक्टिव्ह गुड फाऊंडेशन व घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने 18 ते 27 वयोगटातील युवक व युवतींसाठी केमिकल प्लॅन्ट असिस्टंट ऑपरेटर चे मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात हे प्रशिक्षण होणार असून घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल खेड येथे हे प्रशिक्षण पार पडणार आहे.सदर प्रशिक्षण हे चिपळूण, लोटे,खेड भागातील प्रशिक्षणार्थीना याचा लाभ घेता येणार आहे.केमिकल कंपनीमध्ये कामाचा अनुभव असणाऱ्यांसाठी या प्रशिक्षणात प्राधान्य देण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी सुमित आडमकर 7744005696,अवधूत पावसकर 8999593101,अकबर शेख यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]