व्यापारी संघटना आबलोली, तालुका गुहागर यांची रायगड, प्रतापगड अभ्यासदौरा सहल उत्साहात संपन्न..

व्यापारी संघटना आबलोली, तालुका गुहागर यांची रायगड, प्रतापगड अभ्यासदौरा सहल उत्साहात संपन्न.

व्यापारी संघटना आबलोली, तालुका गुहागर यांची रायगड, प्रतापगड अभ्यासदौरा सहल उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम)…

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील व्यापारी संघटना आबलोली या संघटनेची व्यापारी शेतकरी यांची रायगड, प्रतापगड अशी दोन दिवशीय अभ्यास दौरा सहल नुकतीच उत्साहात संपन्न झाली

. या अभ्यास दौरा सहली मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्यावरील सिंहासनावर स्थानापन्न झालेल्या महाराजांच्या पुतळ्याला आणि महाराजांच्या समाधीला सर्वांनी अभिवादन केले आणि महाराजाचा रायगड किल्ल्यावरील राणी दरबार, मंत्री दरबार तोफ खाणे, बांधकामांची संपूर्ण इतिहास जाणून घेण्यात आला तसेच महाबळेश्वर येथील प्रतापगड किल्ल्यावर जाऊन प्रत्येक पॉईंट ची माहिती घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून घेण्यात आला.आणि महाबळेश्वर येथील मधमाशी प्रकल्पाला भेट देऊन माहिती संकलित करुन मेप्रो गार्डन आणि वेन्ना लेक स्टॉबेरी फार्म ला भेट देऊन स्टॉबेरी शेती कशी करावी, त्या शेतीची माहिती आणि मार्केटिंग कशी करावी याबद्दलहि मौलिक मार्गदर्शन लाभले. त्यानंतर क्षेत्र महाबळेश्वर येथील पंचगंगा देवस्थान ट्रस्टच्या श्री. पंचगंगा मंदिराला भेट देण्यात आली. यावेळी कृष्णा, गायत्री, सावित्री, कोयना, वेण्णा या पंचगंगा नद्यांची मौलिक माहिती जाणून घेतली

 

या अभ्यास दौरा सहली मध्ये दुसऱ्या दिवशी सर्वांना अठराशे रुपये किंमतीचा सकाळचा नाष्टा अजिंक्य नेटके यांनी दिला तर शुभम बाईत यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांना दुपारचे साडेसात हजार रुपये किमतीचे शुद्ध शाकाहारी जेवण दिले तर महेश दिंडे यांनी सर्वांना ॲस्क्रिम दिला . या सर्वांना धन्यवाद देण्यात आले आणि विशेष करून व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष सचिन बाईत, किसन माटल, अजित रेपाळ, विजय पागडे ,प्रदिप पांचाळ, रविंद्र रेपाळ,कृष्णकांत रेपाळ,गणेश महाडिक यांनाही धन्यवाद देण्यात आले. या अभ्यास दौरा सहली मध्ये व्यापारी संघटना आबलोलीचे अध्यक्ष ऋषिकेश बाईत, माजी अध्यक्ष सचिन बाईत, उपाध्यक्ष विजय पागडे, सेक्रेटरी शैलेश jदिंडे,खजिनदार सुनील दाते, धनाजी साळवी,नरेश निमूणकर, प्रदिप पांचाळ,महेश दिंडे, राजेंद्र काताळकर, संतोष नेटके, रविंद्र आंबेकर, किसन माटल,प्रमोद नेटके, अजित रेपाळ, रविंद्र रेपाळ, कृष्णकांत रेपाळ, अतिष रेपाळ,गणेश महाडिक, संतोष चव्हाण,विकास साळवी, अजिंक्य नेटके, नितेश निमूणकर, जगदीश गुरसळे, करण पागडे, धनराज झगडे, संदेश कदम, रमेश महाडिक, रामदास आंबेरकर, आदी. व्यापारी संघटना आबलोली या संघटनेचे शेतकरी बंधू पद्मावती टॅव्हल्सने रायगड, प्रतापगड आदी. अभ्यास दौरा सहल करुन सुखरूप आबलोली येथे आले

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें