खानवली येथील शोभा दत्ताराम गुरव यांचा प्रामाणिकपणा. बस डेपो त सापडलेली दागिने ची पर्स केली पोलिस स्टेशन ला जमा…

खानवली येथील शोभा दत्ताराम गुरव यांचा प्रामाणिकपणा.
लांजा एसटी बस स्थानक प्रवेशद्वार ठिकाणी सापडलेली सोन्याचे दागिने असलेली पर्स लांजा पोलीस ठाण्यात जमा करून खाणवली येथील शोभा दत्ताराम गुरव यांनी आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले.

खानवली येथील शोभा दत्ताराम गुरव यांचा प्रामाणिकपणा.

लांजा (जितेंद्र चव्हाण –  वार्ताहर)

सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी तालुक्यातील वनगुळे गुरववाडी येथील रहिवासी असणाऱ्या सौ. विनिता विकास गुरव यांची पर्स एसटी स्टँड लांजा प्रवेशद्वाराच्या ठिकाणी रस्त्यावर पडलेली होती. त्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे पैंजण व रोख रक्कम असा ऐवज होता.

दरम्यान सदरची पर्स ही सौ. शोभा दत्ताराम गुरव (राहणार गुरववाडी, खानवली) यांना रस्त्यावर पडलेली ही पर्स मिळाली होती. सौ. शोभा गुरव यांनी सदरची पर्स त्यातील दागिने व पैसे याचे सह लांजा पोलीस स्टेशन येथे जाऊन जमा करून आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. सदरच्या वस्तू त्या विनिता विकास गुरव यांना परत करण्यात आलेल्या असून शोभा दत्तराम गुरव यांनी प्रामाणिकपणे दागिन्याची पर्स परत केल्याबद्दल लांजा पोलीस स्टेशन परिक्षेत्राचे पोलीस निरीक्षक श्री. निळकंठ बगळे व पोलीस कर्मचारी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें