ग्राम पंचायात मासिक सभेस नागरिकांना बसण्याचा अधिकार नाकारला. RTI कार्यकर्ता शांताराम पाटील यांची दाभाड ग्राम पंचायात बरखास्त व ग्रामसेवकास निलंबित करण्याची मागणी.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ग्राम पंचायात मासिक सभेस नागरिकांना बसण्याचा अधिकार नाकारला.
RTI कार्यकर्ता शांताराम पाटील यांची दाभाड ग्राम पंचायात बरखास्त व ग्रामसेवकास निलंबित करण्याची मागणी.

वज्रेश्वरी (वार्ताहर)-भिवंडी तालुक्यातील दाभाड ग्राम पंचायत प्रशासनाने ग्राम पंचायतीच्या मासिक साबेस नागरिकांना बसण्याचा अधिकार नाकारून शासनाचा कायदा पायदळी तुडवण्याचा प्रकार समोर आला आहे.

ग्रामस्थांच्या साकार्यातून,ग्राम पंचाय्तीनाचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा आणि भ्रशाचार मुक्त व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून ग्राम पंचायतीच्या मासिक साबेत ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचा शासनाचा कायदा असताना त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पालघर जिल्ह्यातील चिंचणी ग्रामस्थांनी तब्बल सहा वर्ष लढा दिला अखेर त्यांच्या लढ्याला यश येऊन १ मार्च २०२१ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.PRC १०७७/२७०३/CR(२७३२) दि.११/०९/१९७८ व महाराष्ट्र ग्राम पंचायात १९५९ मधील मुंबई ग्राम पंचायात (सभा)बाबत नियम १९५९ (क्र.१७६(२)खंड (७)नियम १ टीप १ मधील तरतुदी पुन्हा स्पष्ट करून ग्रामस्थांना ग्राम्पान्च्यातीच्या मासिक सभेस कोणीही मज्जाव करू शकत नाही.असेआदेश जारी केले आहेत.यासंदार्भाचा दाखला देत दाभाड ग्राम पंचायत हद्दीत राहणारे सामजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार महासंघाचे भिवंडी तालुका अध्यक्ष श्री.शांताराम गो.पाटील यांनी दाभाड ग्राम पंचायत प्रशासनाकडे मासिक साबेस उपस्थित राहण्याची लेखी परवानगी मागितली होती,परंतु ग्रा.प.दाभाड च्या सरपंच श्रीमती.आश्विनी शरद जाधाव व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना कायद्याची पूर्ण कल्पना देऊनही त्यांनी एकमताने ठराव करून श्री.पाटील यांना मासिक सभेत बसण्यास विरोध केला,तसेच ग्राम पंचायत दाभाड यांनी परवानगी नाकारण्या बाबत सन २०२२ ते २०२४ चे दरम्यान दोन ठरव घेतले असून ग्रामपंचायत दाभाड ग्रामविकास अधिकारी राजेद्र बोरसे या प्रकरणात दिशाभूल करण्याचे काम करत आहेत,याविरोधात वरवर तक्रार करुन्ह्ही शासनाकडून कोणतीही अद्याप कारवाई झाली नसून जिल्हा परिषद ठाणे उप्मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे व गटविकास अधिकारी भिवंडी हे देखील पाठीशी घालत आहेत

ग्राम पंचायात मासिक सभेस नागरिकांना बसण्याचा अधिकार नाकारला.
RTI कार्यकर्ता शांताराम पाटील यांची दाभाड ग्राम पंचायात बरखास्त व ग्रामसेवकास निलंबित करण्याची मागणी.

त्यामुळे शांताराम पाटील आणि RTI महास्घाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शंकर बडवले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल करून ग्रामपंचायत दाभाड चे कार्यकारी मंडळ बरखास्त करण्याची व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र बोरसे यांची सखोल चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

 

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]