आमदार किरण सामंत यांच्या मध्स्थीने मनसेचे आंदोलन तात्पुरते स्तागित

आमदार किरण सामंत यांच्या मध्स्थीने मनसेचे आंदोलन तात्पुरते स्तागित

आमदार किरण सामंत यांच्या मध्स्थीने मनसेचे आंदोलन तात्पुरते स्तागित

राजापुर (वार्ताहर) : राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी येणाऱ्या १० दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) आंदोलकांसोबत जिल्हाधिकारी व संबंधित सर्व विभागसह संयुक्त बैठक घेऊन मनसेचे सर्व आक्षेप चर्चेत घेऊन मनसेने सुचवलेले सर्व बदल विचारात घेऊन योग्य मार्ग काढू, असे अश्वस्त केल्याने मनसेने सध्याचे आंदोलन बैठकीपर्यंत स्थगित केल्याचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी जाहीर केले.

या बैठकीत अपेक्षित बदल झाले नाहीत तर मात्र मनसे आपल्या जलसमाधी आंदोलनावर ठाम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राजापूर तालुकाध्यक्ष पंकज पांगेरकर आणि उपतालुकाध्यक्ष व आंदोलक जयेंद्र कोठाराकर उपस्थित होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी : साखरी नाटे (ता. राजापूर) येथे मेरिटाइम बोर्डामार्फत मच्छिमार जेटीचे बांधकाम सुरू आहे. या जेटीला आमचा विरोध नाही; पण ज्या प्रकारे ती लादली जातेय किंवा त्याचा प्लॅन आहे त्याला आमचा विरोध आहे आणि तो आम्ही जन सुनावणीपासून म्हणजे १४ मार्च २०२४ रोजी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केली होती आणि आक्षेप नोंदवलेला होता. तेव्हापासून चाल ढकल करत काम सुरू केले आहे. त्याविरोधात मनसेने २६ जानेवारी २०२५ रोजी प्रकल्पाच्या जागी पाण्यात उतरून अर्ध जलसमाधी आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या ३ तासानंतर प्रांताधिकारी व तहसीलदार जागे झाले व तिथे येऊन आमची आंदोलनकर्त्यांची समजूत काढून आम्हाला आगामी आठ दिवसांत आपणासोबत म्हणजे जिल्हाधिकारी, (प्रांत) उपविभागीय अधिकारी राजापूर, प्रदूषण नियामक मंडळ, मेरिटाइम बोर्ड, मत्स्य विभाग, तहसीलदार राजापूर व आंदोलक, मनसे शिष्टमंडळ अशी संयुक्त बैठक घेऊन आपल्या आक्षेपांवर चर्चेतून मार्ग काढू, तोपर्यंत कंत्राटदाराने काम बंद ठेवावे असे शेकडो लोकांच्यासमोर प्रांताधिकाऱ्यांनी आदेशित केले व आता पाण्याबाहेर या असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन आम्ही सर्वांनी आंदोलन स्थगित केले व पाण्यातून बाहेर आलो.

२६ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंत काम बंद होते. ४ तारखेला आंदोलकाना अंधारात ठेऊन राजापूर प्रांत यांनी जिल्हा व मनसे आंदोलकांविना इतर सर्वांची बैठक घेतली आणि परस्पर काम सुरू केली. याबाबत त्यांना विचारलेअसता मी आपणास कोणताही शब्द दिला नव्हता, असा घुमजाव देखील केला. ही सरासर आम्हा आंदोलकांची फसवणूक आहे. एक प्रथम वर्गाचा सरकारी अधिकारी अशी फसवणूक कशी काय करू शकतो? हा लोकशाहीचा खून आहे. म्हणून प्रांतांच्या या भूमिकेविरोधात व या कामाविरोधात ना इलाजास्तव मला व माझ्या सहकाऱ्यांना जलसमाधी घेऊन आपला निषेध नोंदवण्याशिवाय पर्याय नाही. कारण प्रशनास इतर कोणतीही भाषा कळत नाही. म्हणून हे आंदोलन छेडण्यात आले होते; मात्र राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी हस्तक्षेप करत याबाबत सविस्तर चर्चा करण्यासंदर्भात तसेच आंदोलन मागे घेण्यासंदर्भात सांगितले. लवकरच संयुक्त बैठकीचे आयोजन करून यावर मार्ग काढू असे आश्वासन दिले. त्यानंतर मनसेने हे आंदोलन मागे घेतले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें