संगमेश्वर तालुक्यातील कसबा भेंडी येथे आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या…..

संगमेश्वर तालुक्यातील कसबा भेंडी येथे आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या…..

 

संगमेश्वर (वार्ताहर) –तालुक्यातील कसबा भेंडी येथे आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मृण्मयी गजेंद्र देशमुख हिने शनिवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. आईने वेळेवर शाळेत जाण्यासाठी उठवले नाही, याचा राग आल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कामेरकर आणि महिला पोलीस क्रांती सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला, त्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून संगमेश्वर तालुक्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच एका युवकाने नैराश्येतून आत्महत्या केली होती. शाळकरी मुलीने शुल्लक कारणावरून आत्महत्या केल्याने समाजात चिंता व्यक्त केली जात आहे.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें