गुहागर तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांची विविध प्रात्यक्षिक कार्याची सादरीकरण….

गुहागर तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांची विविध प्रात्यक्षिक कार्याची सादरीकरण….

गुहागर -तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृत्ती प्रशिक्षण ज्युनियर कॉलेज अबबोली येथे अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न होत आहे .सदर प्रशिक्षणामध्ये विविध विषयांचा समावेश करण्यात आला असून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ,राज्य अभ्यासक्रम आराखडा, शालेय शिक्षण ,समग्र प्रगतीपत्रक क्षमता आधारित मूल्यांकन, क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया, क्षमता आधारित मूल्यांकनाची कार्यनीती, प्रश्ननिर्मितीचे प्रकार, क्षमता आधारित प्रश्न निर्मिती कौशल्य ,उच्चस्तरीय विचार प्रवर्तक प्रश्न, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासक आराखडा इत्यादी विषयांच्या अनुषंगाने तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात आले .अध्ययन निष्पत्ती नुसार प्रश्नांची व क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया यावर आधारित गट कार्याचे आयोजन करण्यात आले.त्याचे प्रशिक्षणार्थ्याने अत्यंत समर्पकपणे सादरीकरण केले .त्यावेळी केंद्र संचालक शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास खर्डे ,विषय शिक्षक परमेश्वर लांडे ,शिवानंद साखरे, साधन व्यक्ती रविकांत वाकडे ,नरेंद्र देवळेकर ,विजय आआखाडे, प्रताप देसले ,सुनील गुडेकर ,रामाने सर ,मनोज पाटील, अर्जुन किनोळकर ,प्रभू हंबर्डे व व इतर साधन व्यक्ती उपस्थित होते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें